मुक्ताईनगर पोलीसांकडून वाढत्या गुन्हेगारीबाबत बँकांना मार्गदर्शन

muktai nagar

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर पोलीस स्थानकाच्या वतीने नाशिक आणि रावेर तालुक्यातील निंभोल येथे पडलेल्या सशस्त्र दरोड्याबाबत स्थानिक बँक व पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

नाशिक आणि निंभोल येथे झालेल्या सशस्त्र दरोड्याबाबत सर्वांना माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षेबाबत सीसीटीव्ही, अलार्म सिस्टिम, सुरक्षा रक्षक बाबत सूचना देण्यात आल्या. तसेच कोणी अनोळखी किंवा संशयित इसम आढळून आल्यास तत्काळ पोलिस स्टेशनला कळवावे अश्या सूचना देण्यात आल्या. बँकेत एक स्वागत कक्ष स्थापन करून येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, खाते नं. इत्यादी नोंदविण्यात यावे. सोबत हेल्मेट, स्कार्फ काढून बँकेत प्रवेश द्यावा याबाबत सूचना दिल्या. या बैठकीला पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, पोउनि अशोक उजगरे, निलेश सोळंके, पोहेकॉ अविनाश पाटील, संजय लाटे, देवसिंग तायडे हे उपस्थित होते.

Protected Content