तरुणाचा मोबाईल लांबविणाऱ्या ३ जणांना अटक

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल समोरून रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाला दुचाकीस्वार दोन पुरुषांसह एका महिलेने पैशांची मागणी केली. परंतु त्या तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्याने, तरुणाला मारहाण करीत त्याच्या मोबाईल जबरीने हिसकावून नेल्याची घटना रविवार १० मार्च रोजी घडली होती. जिल्हापेठ पोलिसांनी अवघ्या २४ तासात तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील निमखेडीरोड परिसरात अक्षय विलास शेलार (वय २८) हा तरूण रविवार १० मार्च रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास शहरातील ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे कामानिमित्त आलेला होता. तो पायी जात असतांना मागून दुचाकीवर आलेले अज्ञात दोन पुरूष आणि एक महिलेने यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच काही कळण्याच्या आत त्याच्याजवळील मोबाईल हिसकावून ते तेथून अग्रवाल चौकाकडे पळून गेले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस निरीक्षकांनी गुन्हे शोध पथकाला दिल्या. त्यानुसार गुन्हा शोध पथकातील जुबेर तडवी व अमित मराठे यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांच्या पथकाने संशयित शेख अजरुद्दीन शेख हुस्नोद्दीन उर्फ भुतपलीत (वय ३२, रा. शाहुनगर), मंगल सोमा सोनवणे (वय २८, रा. पिंप्राळा हुडको) व जया जुलाल जाधव (वय २८, रा. सिद्धार्थ नगर, पिंप्राळा हुडको) या संशयितांना सोमवारी ११ मार्च रोजी रात्री ९ वाजता अटक केली. त्यांच्याकडून दुचाकीसह चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

Protected Content