जगात शांती निर्माण करण्याचे सामर्थ्य वेदांतात – प्रो.रामनाथ झा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  वेदांत शास्त्र म्हणजे फक्त आध्यात्मिक शास्त्र नव्हे तर वेदांत शास्त्र हे सामाजिक व्यावहारीक शास्त्र आणि आर्थिक शास्त्र सुद्धा आहे .अद्वैत च्या माध्यमाने मनुष्य मनुष्यत्वाला प्राप्त करू शकतो. अहं ब्रम्हास्मि नुसत्या या शब्दाच्या अनुभवाने पूर्ण जगाला आपण वसुधैव कुटुंबकम् मध्ये बांधू शकतो. असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्लीचे प्रोफेसर झा यांनी केले.

 

मुळजी जेठा महाविद्यालय आणि आयसीपीआर नवी दिल्ली यांच्या संयुक्त तत्त्वावधानामध्ये आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त शंकराचार्यांचे अद्वैत वेदांत या विषयावर आयोजित द्विदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते आपले विचार मांडत होते.

 

याप्रसंगी ऑनलाईन माध्यमातून सहभागी झालेले अखिल भारतीय दर्शन परिषदेचे अध्यक्ष प्रा. (डॉ.) जटाशंकर , डॉ. राजकुमारी सिन्हा तसेच मुख्य वक्ते प्रा. डा. आनन्द मिश्र, विभागप्रमुख दर्शन एवं धर्म विभाग, वराणसी अद्वैत वेदांत विषयाचे संबध आणि महत्व तसेच आताच्या पिढीला त्याची आवश्यकता आदि संकल्पनांचे सुस्पष्ट विवरण त्यांनी सहज आणि सोप्या शब्दात समजावून सांगितले.

 

कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ रामटेकचे कुलगुरू प्रोफेसर हरे राम त्रिपाठी म्हणाले आत्मतत्त्वाचे ज्ञान प्राप्त करणे या जगातील सर्व मनुष्यांचे पहिले कर्तव्य आहे. कारण समस्त भौतिक उन्नती लोक सुखप्राप्तीसाठी करू इच्छितात आणि पूर्ण सुख हे आत्मज्ञानाशिवाय प्राप्त होत नाही. भोपाल येथील हमिदिया कॉलेजचे प्रोफेसर ज्योती स्वरूप दुबे यांनी सुद्धा वेदांत तंत्रज्ञानाच्या व शंकराचार्यांच्या जीवनावर विस्तृत मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर एस एन भारंबे प्रोफेसर देवेंद्र इंगळे हे होते. तर कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन दर्शन विभाग प्रमुख प्रो.डॉ. रजनी सिन्हा यांनी  सूत्रसंचालन डॉ विनय तिवारी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अखिलेश शर्मा यांनी केले.

Protected Content