अमळनेर-लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी | निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणासाठी 4,890 कोटींची सुप्रमा (सुधारित प्रशासकीय मान्यता) मिळविल्याने मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा अमळगाव येथे भव्य स्वागत करून जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विविध विकासकाम भूमिपूजन व लोकार्पणही नामदार अनिल पाटील यांचा हस्ते पार पडले. यावेळी नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस भरतीत निवड झालेले सर्व उमेदवार यांचाही सत्कार मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच इंजी.गिरीश सोनजी पाटील, मा.ग्रामपंचायत सदस्य निलेश पाटील सर, उपसरपंच विकास बोरसे, सदस्या सुनिता पाटील, शितल वाल्हे, सोनाली कुंभार, माधुरी पाटील, सुनंदा चौधरी, सदस्य गोविंदा धावरे यांच्या सह ग्रामस्थ मंडळ एकनाथ भिल, देविदास कुंभार, नाना कुंभार, नरेंद्र चौधरी, गोविंदा चावरे, मंगेश ज्ञंवर, लक्ष्मण पाटील, रवींद्र पाटील, दीपक पाटील, चंद्रशेखर पाटील, विश्वास पाटील, संजय धोबी, पांडुरंग पाटील, प्रशांत धोबी, विजय मोरे, चेतन भिल, सुपडू भिल, हेमंत महाले, निखिल महाले, अण्णा चौधरी, तुषार पाटील, गोलु पाटील, शुभम पाटील, लोकेश पाटील, पंकज पाटील, बापू चौधरी, रमेश पाटील, राजेंद्र पाटील, जितेंद्र वाणी, सुभाष पाटील, सुदाम बोरसे, संदीप पाटील, गोपाल गुरुजी,भैय्या पाटील, भटु पाटील,पिंटू पारधी,मनोज पाटील,गजानन पाटील, राकेश शिंदे,मनिष पाटील,सुनील कोळी, सागर निकम, दिनेश पारधी, भिकन दाजी यांच्या सह तरुण, महिला, राजे ग्रुप मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाडळसरे धरण जन आंदोलन समिती चे अध्यक्ष सुभाष चौधरी, गिरीश पाटील, रवींद्र पाटील, आर बी पाटील, पुरुषोत्तम शेटे, अजयसिंग पाटील, सुनील पाटील, सतीश काटे, महेश पाटील, देविदास देसले, कंखरे साहेब, प्रशांत भदाणे, रणजित शिंदे यांच्या सह पोलीस पाटील संघटनेचे गणेश भामरे, महेंद्र पाटील, जयदीप पाटील, पोलीस पाटील संजय मोरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन इंजी. गिरीष पाटील, निलेश पाटील सर यांनी केले.
या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. यावेळी 2515 अंतर्गत शेत शिवार रस्ता तयार करणे,रक्कम २० लाख, सामाजिक न्याय विभाग अंतर्गत प्रवेशद्वार करणे,रक्कम १५ लाख, भिल्ल समाजासाठी सामाजिक सभागृह बांधणे रक्कम ७ लाख, दलित वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम १५ लाख, एम.आर.जी.इ.एस अंतर्गत अमळगाव निंभोरा रस्ता काँक्रिटीकरण रक्कम ६० लाख या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.