Home Cities अमळनेर आ.अनिल पाटील यांच्या हस्ते कृषी नगरात काँक्रीटीकरणाचे भुमिपूजन

आ.अनिल पाटील यांच्या हस्ते कृषी नगरात काँक्रीटीकरणाचे भुमिपूजन

0
59

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील ढेकू रोडवरील कृषीनगर परिसरात दत्त मंदिर येथे खुल्या जागेवर काँक्रीटकाम करण्यासाठी आ. अनिल पाटील यांच्या हस्ते रक्कम रु.१०  लक्ष निधी मंजूर झाल्याने यासह विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

 

विविध विकास कामांच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी आ. अनिल पाटील यांचे कॉलनीवासीयांनी जोरदार स्वागत करून सत्कार केला. यावेळी आमदारांनी मनोगत व्यक्त करताना विकास कामांचा आढावा मांडून शहरात विकास कामसोबतच अवैध धंद्यांना रोखने हे देखील आपले उद्दिष्ट असल्याचे सांगत ते आज बऱ्यापैकी कमी झाल्याने शहरात कुठेतरी बदल घडलाय असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  ढेकू रोड आणि पिंपळे रोड परिसराच्या विकासासाठी  नेहमीच तत्पर राहण्याची ग्वाही आमदारांनी यावेळी दिली.    याप्रसंगी एस. टी. कामगार नेते एल.टी.पाटील, नगरसेविका गायत्री दीपक पाटील, दिपक पाटील (वावडे), देविदास देसले, आत्मा कमिटीचे अध्यक्ष सुनिल पवार, रढावणचे भैयासाहेब पाटील, पंकज पाटील, अजबराव पाटील, राजेंद्र पाटील, डी.डी.पाटील, सुनिल पाटील, रविंद्र पाटील,अविनाश जाधव, मनिष भावसार, सुरेश पाटील, दिलिप ठाकरे, युवराज शिंदे, विश्वास ठाकरे, इच्छाराम पाटील, डॉ. चंद्रशेखर भदाणे, मधुकर मराठे, रघुनाथ शिंदे, राजेश बारड, रतीलाल भावसार, डी.बी. पवार, आर.एच.सोनवणे, विजय बडगुजर, बी.ऐन.पाटील. अजय पवार, दत्तात्रय निकुंभ, संजय जगताप, संजय सुर्यवंशी, राजेंद्र पाटील, गुलाबराव शिसोदे, संजय विसपुते, गुलाबराव पवार, पंकज सूर्यवंशी, वसंत पाटील, पंकज पाटील, आर. डी. महाजन व नागरिक उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound