जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील निवृत्ती नगरातील केरळी महिला ट्रस्ट संचलित शिवमंदिरात श्रावणी सोमवार निमीत्त लघू रूद्राभिषेक पूजन करण्यात आले यावेळी जय भोलेनाथ जयघोषाने परिसरात भक्तीमय वातावरण निर्मीती झाल्याचे दिसून आले.
संस्थापक अध्यक्ष श्रीमती अयर यांच्या संकल्पनेतून केरळी महिला ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते.रुद्राभिषेक पूजा घरातून नकारात्मकता दूर करते आणि घरात सकारात्मक वातावरण बनते ।रुद्राभिषेक करण्यासाठी या जन्मासह शेवटचा जन्मही नष्ट होतो आणि भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो, सर्व देवता प्रसन्न होतात, ही पूजा केल्याने कालसर्प योग प्रभाव दूर होतो आणि श्रावणात लघुरूद्रभिषेक पूजा ही फलदायी असते अशी आख्यायिका आहे.
यावेळी शिवलिंगाची विधिवत पूजन मंदीराचे पूजारी अनिल रोकडे यांनी सोवळे परिधान करत अत्यंत धार्मिक वातावरणा विधवत पूजा केली.यावेळी ११ ब्राम्हण देखिल उपस्थीत होते. पूजा संजीवंजी व गंगाजी या जोडप्याने केली तर परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थीत होते. यावेळी वरूणराजाची कृपा झाल्याने बळीराजा आंनदला असून देशाच्या एैक्य व सुखसमृध्दीसाठी साकडे घालण्यात आले