सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वैशाख मीडियाच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी मिलिंद टोके यांची विभागीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. दिनांक २९ सप्टेंबर रविवार रोजी त्यांचा पदग्रहण सोहळा मुंबई येथील कुलाबा येथे मुंबई प्रेस क्लब येथे संपन्न झाला.
यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार व पदग्रहण सोहळा संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, मुख्यमंत्री वैद्यकीयमदत निधीचे प्रमुख मंगेश चिवटे रामेश्वर नाईक यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, कार्याध्यक्ष योगेश दोरकर महासचिव दिव्या भोसले उपस्थित होते.