ग्वाल्हेरजवळ ‘मिग-२१’ लढाऊ विमान कोसळले

viman

 

ग्वाल्हेर वृत्तसंस्था । मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळ भारतीय हवाई दलाचे एक ‘मिग-२१’ हे लढाऊ विमान कोसळल्याची घटना आज घडली आहे. हे ‘मिग-२१’ विमान गस्त घालत असताना दुर्घटना झाली. मिगमधील दोन्ही वैमानिक बचावले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ‘मिग -२१’ विमान प्रशिक्षणासाठी वापरात होते. या वर्षात मिग क्रॅश होण्याची ही तिसरी घटना आहे. सुमारे ५ दशक जुनी असलेली ही विमाने बदलण्यात यावीत अशी मागणी प्रदीर्घ काळापासून होत आहे. ‘फ्लाइंग कॉफिन’ या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या विमानांऐवजी ‘तेजस’ हे एचएएलद्वारे निर्मित देशी हलके लढाऊ विमान वापरात आणावे अशी मागणी सातत्याने होत आहे.

Protected Content