बसपचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची तीक्ष्ण हत्यारांनी वार करून हत्या


चेन्नई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून त्यांची हत्या केली. शहरातील सेंबियम भागात त्यांच्या घराजवळ पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आर्मस्ट्राँग यांना त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेनंतर परिसरात तनावाचे वातावरण होते. ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार यांनी ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी हल्लेखोरांना अटक करण्यासाठी एक विशेष पथक तयार केले आहे. घटनास्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

विरोधकांनी तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकवर निशाणा साधला असून ही हत्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा पुरावा असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षनेते एडप्पादी पलानीस्वामी म्हणाले, एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची हत्या झाल्यावर मी काय बोलू? कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लाजिरवाणी आहे. कायद्याची किंवा पोलिसांची गुन्हेगारांना भीती नाही. चेन्नई कॉर्पोरेशन कौन्सिलवर २००६ मध्ये आर्मस्ट्राँग यांची निवड झाली. दोन वर्षांपूर्वी चेन्नईत मेगा रॅलीचे आयोजन करून आणि बसपा प्रमुख मायावती यांना निमंत्रण दिल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बसपाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग हे शुक्रवारी रात्री त्यांच्या चेन्नईतील घराबाहेर मित्रांबरोबर बसले होते. याचवेळी डिलिव्हरी बॉय म्हणून सहा जण दुचाकीवरून आले. आर्मस्ट्राँग हे बेसावध असतांना त्यांच्यावर सर्वांनी जोरदार हल्ला चढवला. यात त्यांच्यावर अनेक वार करण्यात आले. यात आर्मस्ट्राँगवर हे गंभीर जखमी झाले. आरडाओरडा झाल्यावर त्यांचे कुटुंबीय घराबाहेर आले. त्यांना कुटुंबियांनी आर्मस्ट्राँग यांना जवळच्या रुग्णालयात तातडीने भरती केले. मात्र, उपचार करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.