अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिला आईच्या पोटात, घरात, शाळेत, रस्त्यावर समाजात सुरक्षित नाही तर सुरक्षा कुठे मिळेल? दोन वर्षांपासून सखी सावित्री समिती स्थापन झाली मात्र समिती कागदावर राहिली आहे. शाळा महाविद्यालयात कराटे,लाठ्या काठ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात असले पाहिजे, असे मुद्दे फिनिक्स ग्रुपच्या ॲड ललिता पाटील यांनी ‛गर्ल्स प्रोटेक्टिव्ह मिशन’ अंतर्गत विविध शाळा महाविद्यालयात मार्गदर्शन करताना उपस्थित केले. वसुंधरा लांडगे मॅडम यांनीही प्रबोधन केले. डॉ प्रतिभा मराठे, लताताई पाटील व प्राचार्य आशिष शर्मा उपस्थित होते.
राज्यपाल जळगाव येथे आले असता फिनिक्स ग्रुपतर्फे मुलींना सुरक्षित आणि संरक्षित शिक्षण मिळण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगितले. घरोघरी आचारसंहिता फक्त मुलींना नको तर मुलांनाही हवी. झाशी राणी, मॉ जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून काहीच होणार नाही, त्यांचे गुण व चरित्र आत्मसात करावे लागतील.
दुर्गा, महाकाली, रणचंडिका बना असे आवाहनही त्यांनी मुलींना केले. समाजात येऊन बोला तुमची मतं चौकात येऊन मांडा. जी स्पष्ट बोलेल तीच वाचेल. अमळनेर येथील इंदिरा गांधी शाळा, जय योगेश्वर व शांतिनिकेतन शाळा, जी.एस हायस्कूल, स्वामी विवेकानंद स्कूल, राजश्री शाहू महाराज हायस्कूल, लोकमान्य विद्यालय ॲड ललिता पाटील स्कूल, पी.बी.ए. इंग्लिश स्कूल,प्रताप कॉलेज सीनियर व ज्युनियर,पद्मावती मुंदडा हायस्कूल,न्यू मराठी स्कूल, बोहरा इंग्लिश स्कूल,एम एस डब्ल्यू कॉलेज,गायकवाड हायस्कूल,डी आर कन्या शाळा,सावित्रीबाई फुले स्कूल, भगिनी मंडळ स्कूल येथे मुली व मुलांना मार्गदर्शन केले यावेळी सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले व विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेतले.