आरटीई प्रवेश प्रक्रियेस उद्यापासून प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील शाळांमध्ये ३०६५ जागांसाठी आरटीईच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार असून याची प्रवेश प्रक्रिया ३ मार्चपासून प्रारंभ होत आहे.

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. याच्या अंतर्गत यंदा २९६ शाळा पात्र ठरल्या आहे. या सर्व शाळांमधील ३०६५ जागांसाठी आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले असून ३ ते २१ मार्च दरम्यान पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे.

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) अंतर्गत प्रवेशासाठी पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज भरायचे आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २१ मार्चपर्यंत आहे. आरटीई २५ टक्के प्रवेश पोर्टलवर २०२०-२१ करीता पात्र २९६ शाळांची नोंदणी पुर्ण झाली आहे.

इच्छुक पालकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन घ्यावी, अर्ज भरताना योग्य ती काळजी घ्यावी. यंदाही एकच सोडत जाहीर होणार असून त्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेनंतर प्रतीक्षा यादीत विद्यार्थ्यांना फेरी निहाय प्रवेश दिला जाणार आहे.

Protected Content