सदस्य अपात्रता विषयावरून गाजली जि. प. सर्वसाधारण सभा (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 07 at 8.26.30 PM

जळगाव, प्रतिनिधी | सदस्य अपात्र करण्यात येणार असल्याचे स्थानिक वृत्तपत्रात छापून आल्याने लालचंद पाटील यांनी कोणत्या सदस्यांना अपात्र करण्यात येणार आहे याची विचारणा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली.

ही सभा जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती नंदकिशोर महाजन, शिक्षण, क्रिडा व अर्थ समिती सभापती पोपट भोळे, समाज कल्याण समिती सभापती प्रभाकर गोटू सोनवणे, आरोग्य समिती सभापती दिलीप पाटील, महिला व बालकल्याण आणि बांधकाम सभापती रजनी चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे व्यासपीठावर उपस्थित होते. लालचंद पाटील यांनी अपात्र होणारे ते ४ सदस्य कोण ? व अशी माहिती देण्याऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देतांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड यांनी सांगितले की असा कोणताही प्रस्ताव नाही. ग्रामसेवकांचे २२ तारखेपासून काम बंद आंदोलन सुरु आहे. त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाकडे चावी न देता ती परस्पर विस्तार अधिकार यांना दिली. यावरुन संबधित विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. २२ तारखेला विस्तार अधिकारी यांची समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीतच ग्रामसेवकांनी चावी त्याच्याकडे सुपूर्द केली. चावी घेण्याचा कोणताच अधिकार नसतांना त्यांनी चावी का ठेऊन घेतली असा आरोप सदस्यांनी केला. यावर ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे यांनी त्या चाव्या संबधित ग्रामसेवकांना देण्याचे सांगिलते असता ग्रामसेवकांनी चावी घेण्यास नकार दिल्याची माहिती सभागृहास दिली. ग्रामपंचायतीच्या चाव्या  घेतल्याने विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई करा असे आदेश देण्यात आले.

पालकमंत्र्यांना बदनाम करू नका   : मधुकर काटे

नानाभाऊ महाजन यांनी जिल्हा परिषदे कर्मचाऱ्यांची पदोन्नती ६ महिन्यापासून रखडली असल्याचा आरोप केला. मागील सर्वसाधारण सभेत पदोन्नती करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती तरी देखील पदोन्नती का करण्यात आल्या नाहीत असा प्रश्न नानाभाऊ महाजन यांनी उपस्थित केला. अधिकारी केवळ वेळ दवडत असून आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षणाधिकारी डी. डी. देवांग यांनी आज पर्यत १०४ पदोन्नती करण्यात आल्याची महिती दिली. तसेच मराठा आरक्षणामुळे बिंदू नामावलीनुसार यादी करावी लागेल असे सांगितले. आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनी म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी का देण्यात आले नाहीत ? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीतर्फे शिक्षक दिनी पुरस्कार जाहीर न केल्याने हा एकप्रकारे शिक्षकांचा अपमान असल्याचा आरोप केला. तसेच पुरस्कार वितरणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला. तसेच याविरोधात आंदोलनाचा राष्ट्रवादीतर्फे इशारा देण्यात आला. तर शिक्षण समिती सभापती पोपट भोळे यांनी त्यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पैसे घेतले नाहीत. पैसे घेतले असे सिद्ध झाले तर आपण राजीनामा देऊ असे स्पष्ट केले. या उत्तरावर काही सदस्यांनी नाराजी व्यक्त करत आदर्श शिक्षकांची यादी जाहीर करा असा पवित्र घेतला. यावर सभापती भोळे यांनी पालकमंत्री ५ तारखेला पूरपरिस्थितीमुळे अडकल्याने नियोजित कार्यक्रम रद्द करावा लागल्याची माहिती दिली. यावर भाजपा सदस्य मधुकर काटे यांनी पालकमंत्री आलेले होते. त्यांना बदनाम करू नका ? नेमके काय चालू आहे हे सभागृहाला कळू द्या. तुमच्या चुकीचे खापर पालकमंत्र्यांवर फोडू नका असे सांगितले. पंचायत समितीवर बोटे यांचे नियंत्रण नसल्याने घरपट्टी वसुलीचा खोटा आकडा दिला जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. नानाभाऊ महाजन यांनी वसुली संदर्भात धूळफेक केली जात असल्याचे म्हटले. वसुली संदर्भात त्रयस्थ संस्थेमार्फत तपसणी करण्यात यावी असी मागणी त्यांनी केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड यांनी सांगितले की, अशी खोटी माहिती देण्याऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. जीर्ण झालेली जुनी जि.प. इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत उभारणी करण्यासाठी वस्तूविशारदाची नेमणूक करण्याचा प्रस्तावास नानाभाऊ महाजन यांनी विरोध केला. जिल्हा परिषदेत वस्तू विशारद पॅनलवर असतांना नवीन वस्तू विशारद नेमू नये तसेच हे बांधकाम बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या ततत्त्वावर करून नये अशी भूमिका घेतली. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांचे संरक्षण केले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. यात जळगाव शहरातील जि. प. मालकीच्या जी.एस. ग्राउंड येथे जळगाव पंचायत समिती व जि. प. विद्यानिकेतन शाळा आहे. मात्र, तेथे सुरक्षा रक्षक नसल्याने अवैध धंदे सुरु असल्याचे सांगून तेथे त्वरित रात्र पाळीला  सुरक्षा रक्षक नेमण्यात यावी अशी मागणी केली.

Protected Content