Home क्राईम उपमहापौरांवर गोळीबार करणारा सहावा संशयित अटकेत

उपमहापौरांवर गोळीबार करणारा सहावा संशयित अटकेत

0
104


जळगाव प्रतिनिधी | उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करणार्‍या सहाव्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना २५ जुलै रोजी रात्री घडली होती. सुदैवाने या हल्ल्यात ते बचावले. होते. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यातील बेपत्ता संशयित भूषण बिर्‍हाडेला मंगळवारी रोजी पोलिसांनी अटक केली. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात उपमहापौर पाटील यांच्यावर किरण राजपूत, उमेश राजपूत, मंगल राजपूत, जुगल बागुल, महेंद्र राजपूत व भूषण बिर्‍हाडे यांनी पाटील यांच्या घरी जाऊन गोळीबार केला होता.

या प्रकरणातील पाच संशयिताना आधीच अटक करण्यात आली होती. यानंतर सहाव्या संशयिताचा कसून शोध सुरू असतांना त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे.


Protected Content

Play sound