भुसावळात मेहतर-वाल्मिकी, सुदर्शन समाजाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । येथील टी.व्ही. टॉवर मैदानावर मेहतर-वाल्मिकी व सुदर्शन समाजाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन २१ फेब्रुवारी रोजी दुपारी आयोजित करण्यात आल्याची माहिती आज संतोष बारसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पहेलवान पुत्र ग्रुपचे नगरसेवक संतोष बारसे व भुसावळ कृती समिती यांनी आज शासकीय विश्राम गृहात सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी राजू खरारे,हरीश धनजे गुरुजी,गब्बर चावरीया,संजय चव्हाण,मोहन भरारु,शंकर करोसिया, दिनेश बालूूरे, सुनील पवार यांच्या उपस्थितीत मेहतर वाल्मिकी ,सुदर्शन समाज राज्यस्तरीय महाअधिवेशन बाबत पत्रकारांना माहिती दिली.

या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे माहिती संतोष बारसे यांना आ. एकनाथराव खडसे यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांना कार्यक्रमाचे नगरसेविका सोनी संतोष बारसे यांच्याव्दारे निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रस्त्याच्या काँक्रीटीकरणच्या भूमीपूजनासाठी आल्यानंतर मेहतर वाल्मिकी ,सुदर्शन समाज राज्यस्तरीय महाअधिवेशनाला दुपारी भेट देणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या अधिवेधनाला ३६ जिल्ह्यातून सुमारे ५० हजार समाज बांधव येणार असल्याची माहीती दिली. या अधिवेशनाच्या नियोजनासाठी ११ सभासदांची भुसावळ कृती समितीचे स्थापना करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पहा– संतोष बारसे पत्रकार परिषदेत नेमके काय म्हणालेत ते !

Add Comment

Protected Content