मेहरूण व एमआयडीसी परिसरात चोरीच्या उद्देशाने फिरणारे पाच संशयित पोलीसांच्या ताब्यात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मेहरूण स्मशानभूमी व एमआयडीसी परिसरात घरफोडी व चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या पाच संशयितांना एमआयडीसी पोलीसांनी शुक्रवार १८ फेब्रुवारी रोजी रात्री ताब्यात घेतले आहे. पाचही संशयितांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरातील मेहरुण स्मशानभूमीजवळ आणि एमआयडीसी परीसरातील जुनी ट्रायडंट कंपनीजवळ चोरी, घरफोडी करण्याच्या उद्येशाने काही संशयित फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना शुक्रवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी रात्री ८ वाजेच्या सुमारास सापळा रचून संशयित आरोपी  सलमान अजीम तडवी, (वय-२५), सुनिल शेषमल चव्हाण, (वय-२४), तुषार डिगंबर सासवडे, (वय-३०) , महाविर किशोर जैन, (वय-३१) आणि शोएब बेग मुश्ताक बेग, (वय-२६) सर्व राहणार रामेश्वर कॉलनी, जळगाव यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता घरफोडी करणार असल्याची खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, प्रदीप पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील, इम्रान सैय्य्द, मुदस्सर काझी, योगेश बारी, साईनाथ मुंढे यांनी केली.

 

Protected Content