खाद्य पदार्थांची चढ्या दरात विक्रीची तक्रार ; आयनॉक्स मल्टीप्लेक्सवर धाड (व्हीडीओ)

WhatsApp Image 2019 07 23 at 4.49.24 PM 1

जळगाव प्रतिनिधी | आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ जादा दराने विक्री करण्यात येतात. तसेच प्रेक्षकांना सोबत खाद्य पदार्थ किंवा पाणी नेण्यास मनाई असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. यानुसार आज अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक नियंत्रक राजेंद्र बांगर यांनी आपल्या पथकासह दुपारी ३.३० वाजता जाऊन कारवाईस सुरुवात केली.

 

शहरातील मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मनाई आहे. तसेच तेथे खाद्यपदार्थ अधिक किंमतीत विक्री केले जातात. यासंदर्भात माहितीअधिकारी कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी १५ जुलै रोजी जिल्हाधिकारी व एस.पी.यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. आयनॉक्स मल्टिप्लेक्स सिनेमा हॉलमध्ये खाद्यपदार्थ तसेच पाणी सुद्धा सोबत घेऊन जाण्याची प्रेक्षकांना परवानगी नाही. सिनेमा हॉलमध्ये जे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. ते प्रमाणापेक्षा जास्त किंमतीत विक्री करण्यात येत आहे. या तक्रारीनुसार सहाय्यक नियंत्रक बांगर यांच्या पथक आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये तपासणी केली. याबाबत अधिक माहितीसाठी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

 

Protected Content