रावेर प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आज रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत मुंबईत आढावा घेण्यात आला.
आज मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी खान्देशातील लोकसभेच्या उमेदवारांबाबत चर्चा केली. यात रावेर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. आगामी लोकसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर मुंबई आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली यावर रावेर लोकससभा व विधानसभा मतदारसंघा बाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
यावेळी त्यांच्या सोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जळगाव पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लोकसभा व विधानसभा दोन्ही मतदारसंघ बाबत सविस्तर चर्चा झाली वृत्त असुन आगामी निवडकीबाबत मुख्यमंत्र्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिल्याचे समजते. तसेच त्यांनी भाजपा शासनाच्या योजना जनते पर्यंत पोहचविण्याच्या सूचना दिल्या यावेळी रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, हर्षल पाटील, सुनील नेवे आदींची उपस्थिती होती.