बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील हिगणे येथे तालुका कृषी अधिकारी सी.के.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम कृषी विकास समिती’ची सभा संपन्न झाली.
सोमवार, दि.११ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता संपन्न झालेल्या या सभेचे सूत्रसंचालन श्री.वडजे यांनी केले. या सभेत ‘पाण्याचे नियोजन कसे करावे ?, शेतात पेरणी कशी करावी ?, खते किती प्रमाणात टाकावे ? यासह शेततळेबद्दल आणि विविध योजनेबाबत माहिती देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना बोदवड तालुक्यात बोगस बियाणे मोठ्या प्रमाणात विकले जाते. अधिका-यानी याकडे लक्ष द्यावे जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. असा सूर निघाला.
यावर तालुका कृषी अधिकारी श्री.पाडवी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, ‘यापुढे बोदवड तालुक्यात बोगस बियाणे खरेदी करु नये व दुकानदाराने पण विक्री करू नये जर दुकानदार बोगस बियाणे विकत असेल आणि माझ्याकडे शेतकऱ्यांच्या तक्रार आल्यास दुकानदारावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. असे त्यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले.
या ठिकाणी रवींद्र सुभाष पाटील, अरूण भगवान पाटील. सुरेश पाटील, देवराम पाटील, गोपाळ तुकाराम पाटील, आनंदा पाटील, मनीषा रामराव पाटील, पल्लवी समाधान अहिरकर, यशोदाबाई प्रभाकर पाटील, रूपाली भागवत पाटील, बाळू पाटील, रमेश पाटील, सोपान पाटील, विलास होडगरे, संदीप होडगरे, अरुण पाटील, अशोक पाटील, पंढरी लालू पाटील, आनंदा पाटील, सोपान रामा होडगरे आदींची उपस्थित होते. आभार श्री.मोरे यांनी मानले.