Home Uncategorized ड्रामा क्वीन’ राखी सावंतला अटक

ड्रामा क्वीन’ राखी सावंतला अटक

0
35

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नेहमी वादाच्या भोवर्‍यात राहणारी अभिनत्री राखी सावंत हिला पोलिसांनी अटक केली आहे.

अभिनेत्री राखी सावंतला आंबोली पोलिसांनी अटक केले आहे. एका मॉडेलचा फोटो आणि काही खासगी व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी आंबोळी पोलिसांनी राखी सावंतला अटक केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या लग्नामुळे चर्चेत आली. बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबतचे तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सात महिन्यांपूर्वी लग्न केल्याचं राखीने कबुल केलं होतं. मात्र आदिलने सुरुवातीला हे लग्न स्वीकारण्यात नकार दिला होता. लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राखीने धर्मांतर केल्याचीही कबुली दिली होती. मॅरेज सर्टिफिकेटवर तिचं नाव ‘फातिमा’ असं लिहिण्यात आलं होतं. लग्नासाठी धर्मांतर केल्याचं राखीने स्पष्ट केलं.

दरम्यान, राखी सावंत हिने एका महिला मॉडेलचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ पत्रकार परिषद घेऊन व्हायरल केल्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तिचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात आल्यानंतर तिला आज अटक करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound