कोकण पूरग्रस्तांसाठी स्वामी समर्थ केंद्रामार्फत साहित्य व रोख रक्कम

पाचोरा, प्रतिनिधी | येथील संघवी काॅलनीतील श्री. स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रेणित) तर्फे कोकणातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य सह रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली आहे.

प. पू. गुरुमाऊलींच्या संकल्पनेतील ८० टक्के सामाजिक कार्य व २० टक्के आध्यत्मिक सेवा या दृष्टिकोनातून श्री. क्षेत्र स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रेणित), संघवी काॅलनी, पाचोरातर्फे कोकणातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत मोजून ४८ तासात शनिवार व रविवार लॉक डाउन असल्याने दुकाने बंद असतांना

पाचोरा तालुक्यातून २७२ (ब्लँकेट), २३८ (पायपुसनी), २४१ (टॉवेल), लहान मुलांसाठी स्वेटर, १७७ (मोठी मेणबत्ती) आर्थिक मदत – ९ हजार ९२९ रुपये अशा स्वरूपाचा मदतीचा हात श्री. स्वामी समर्थ केंद्र, पाचोरा तर्फे कोल्हापूर येथे रवाना करण्यात आला आहे. श्री. स्वामी समर्थ केंद्राच्या या कार्याचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

 

 

Protected Content