यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील परसाडे बुद्रुक येथे ग्रामपंचायत परसाडे आणि आस बहुउद्देशीय संस्था, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी तडवी भिल समाजाचा दुसरा सामूहिक विवाह सोहळा शनिवारी, १० मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या सामुदायिक विवाह सोहळ्याला समाजबांधवांचा उदंड प्रतिसाद मिळाला, ज्यात एकूण १४ जोडपी विवाहबंधनात अडकली आहे. या मंगल सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
कार्यक्रमाची सुरुवात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दुर्घटनेतील शहीद जवान आणि नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांचे यथोचित स्वागत करण्यात आले. याप्रसंगी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे, गोदावरी फाउंडेशन जळगावच्या संचालिका डॉ. केतकी पाटील आणि एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी उपस्थित राहून नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद दिले.
या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या सर्व १४ जोडप्यांना प्रत्येकी गादी, पलंग आणि संसारोपयोगी ४५ भांडी भेट म्हणून देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी वाहेद ए. तडवी, निवृत्त डीवायएसपी रशिद एस तडवी, एएसआय (बुलडाणा) दिलदार बी. तडवी, पाणीपुरवठा अधिकारी जलदार बी तडवी, आरोग्य विभागात कार्यरत नामदार बी. तडवी, विस्तार अधिकारी (प. स. यावल) हबीब एन तडवी, शिक्षणाधिकारी (बृहन्मुंबई) राजू अमिर तडवी, सरपंच (धानोरा) रज्जाक तडवी, सरपंच (मोहमांडली) रजियाताई तडवी व मुस्तुफा तडवी, सरपंच (मोहरद) हाजी रमजान तडवी, पत्रकार मन्सूर तडवी, अँड. सिकंदर सुभान तडवी (भुसावळ), अहमद जबरा तडवी, पर्यवेक्षिका (ठाणे) कु. माया तडवी, मुनाफ जुम्मा तडवी, रशिद तडवी, हुसेन तडवी, फिरोज तडवी, हजरा तडवी (जळगाव), युनुस तडवी (आ. विकास विभाग), सभापती (कृ.उ.बा. स. यावल) राकेश वसंत फेगडे, संचालक (कृ. उ. बा. स) हर्षल पाटील, मुख्याध्यापक (सिंधुदुर्ग) रहिमान कालू तडवी, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार दगेखा शावका तडवी, सकावत तडवी (तससिल, यावल), भूषण गुरुजी यावल, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक (बदलापूर) निजाम तडवी, अजित हुसेन तडवी (तडवी कृती समिती), सचिन तडवी (नायगाव), राजू तडवी सर (भालोद) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परसाडे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी मोलाचे परिश्रम घेतले. आलेल्या मान्यवरांनी परसाडे गावातील नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.