भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिचर्डे येथील संजय भगवान महाजन या जवानाला सेवेत असतांना आजारपणामुळे वीरगती प्राप्त झाली असून त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पिचर्डे येथील सी.आर.पी.एफ जवान संजय भगवान महाजन यांना सेवेत कार्यरत असतांना विरगती प्राप्त झाली. श्री. महाजन हे २२/११/२००२ रोजी पुणे तळेगाव येथे भरती झाले होते. ते भारतीय सैन्य दलात विविध राज्यांत 22 वर्षे 5 महिने सेवेत होते. कर्तव्यावर असतांना अचानक प्रकृती खराब झाली. त्यांना लगेच दवाखान्यात दाखल केले पण प्रकृती गंभीर झाल्याने उपचारा दरम्यान भोपाळ येथे दि १२/५/२०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता विरगती प्राप्त झाली.
त्यांच्या पश्चात आई वडील दोन भाऊ पत्नी दोन मुले असून शहिद जवान संजय महाजन यांचे पार्थिव आज गावात सकाळी येणार आहे त्यांनंतर गावात अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. दि १३ मे रोजी सकाळी ११ वाजती अत्यंविधी पिचर्डे येथे होणार आहे. ते पिचर्डे येथील भगवान महाजन यांचे लहान सुपुत्र तर राजेंद्र महाजन, तुकाराम महाजन यांचे बंधु होते.