शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सियाचीनमध्ये शहीद झालेले कॅप्टन अंशुमन यांना शुक्रवारी राष्ट्रपती भवनात मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या पत्नी स्मृती आणि आई मंजू यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. यावेळी स्मृती म्हणाल्या- कॅप्टन अंशुमन खूप सक्षम होते. मला सामान्य माणसासारखे मरायचे नाही, ज्याला कोणी ओळखत नाही. छातीवर गोळी लागून मला मरायचे आहे, असे ते अनेकदा म्हणायचे.

19 जुलै 2023 रोजी सकाळी सियाचीन ग्लेशियरमध्ये भारतीय सैन्याच्या अनेक तंबूंना आग लागली. यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करताना रेजिमेंटल मेडिकल ऑफिसर कॅप्टन अंशुमन सिंग शहीद झाले. उत्तर प्रदेशातील देवरिया येथे राहणारे अंशुमन सिंह यांचे अपघाताच्या 5 महिने आधी म्हणजेच 10 फेब्रुवारी 2023 रोजी लग्न झाले होते. या घटनेच्या केवळ 15 दिवस आधी अंशुमन सियाचीनला गेले होते.

Protected Content