कोरोना : आता दिल्लीत वीकेंड लॉकडाऊन

दिल्ली वृत्तसंस्था । देशात कोरोना वाढता प्रादुर्भाव आणि व्हेरियंट ओमायक्रॉन नवीन संसर्ग लक्षात घेता देशाच्या राजधानी दिल्लीत वीकेंट लॉकडाऊन लावण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे.

 

दिल्ली डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची आज महत्त्वाची बैठक घेण्यात आली. झपाट्याने वाढणारे कोरोनाचे रूग्ण संख्येत वाढत होत असल्याचे लक्षात घेत कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील विविध राज्यात ओमायक्रॉनचा धोका देखील वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात ३७ हजार ३७९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ११ हजार ७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या ही चिंता वाढवणारी आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत १० टक्क्यांची वाढ झाली आहे.

 

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, डीडीएमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दिल्लीमध्ये कोविड-19 चे वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विकेंड कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यासोबतच त्यांनी सांगितलं की, दिल्लीमध्ये आवश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व सरकारी अधिकाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त खाजगी संस्थांमधून 50 टक्के वर्क फ्रॉम होम करण्यासाठी सांगितले आहे.

 

Protected Content