‘मुझसे शादी कर’ म्हणत महिलेचा विनयभंग; एमआयडीसी पोलीसात एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेच्या नात्यातील एकाने ‘मुझसे शादी कर’ असे म्हणत विनयभंग केल्याप्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणाऱ्या २८ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्या शहरातील एका हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. १९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे महिला रिक्षाने हॉस्पिटलमध्ये कामाला निघाल्या. त्यावेळी त्यांच्या नात्यातील जवळच्या वक्ती आबीद तसलीम पिंजारी रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी हा (एमएच १९ एएफ ४८२१) क्रमांकाच्या दुचाकीने महिलेचा पाठलाग करून हॉस्पिटलपर्यंत आला. रिक्षातून उतरल्यानंतर संशयित आरोपीने महिलेला ‘मुझसे शादी कर, मै तेरा खर्चा उठाऊंगा’ असे सागून शिवीगाळ करून विवाहितेचा विनयभंग केला. याप्रकरणी २० एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.