कानळदा रोड येथे विवाहितेचा विनयभंग; शहर पोलीसात एकावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कानळदा रोड येथे राहणाऱ्या ५० वर्षीय विवाहिता पायी जात असतांना एकाने ओढणी ओढून विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, शहरातील कानळदा रोड येथे ५० वर्षीय विवाहिता आपल्या दोन मुलांसह राहतात. त्याच भागात विवाहितेचे माहेरही आहे. १९ एप्रिल रोजी ९ वाजेच्या सुमारास विवाहिता आपल्या आई घरी जाण्यासाठी पायी जात असतांना शाहरूख खाटीक रा. लक्ष्मीनगर  हा विवाहितेच्या समोरून येत असतांना तिच्या खंद्याला धक्का दिला. व ओढणी ओढून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याचा जाब विचारला असता संशयित आरोपी शाहरूखने विवाहिले अश्लिल शिवीगाळ केली. दोन्ही मुले व भाऊ धावत आल्याचे पाहून शाहरुखने पळ काढला. विवाहितेच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे. 

Protected Content