वरणगावात विवाहितेची आत्महत्या ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव येथिल अक्सानगरातील रहिवाशी असलेल्या विवाहितेने आपल्या राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना (दि.२२) शनिवार रोजी घडली होती. याप्रकरणी, महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलिसात सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत मिळालेल्या माहीतीनुसार प्रकरण असे की, सावदा येथील मोहम्मद खालीद मोहम्मद शफी यांची मोठी मुलगी रूखसारबी (वय- २२ ) हिचा विवाह वरणगाव येथील त्यांचे साडू उसमानखान मोहम्मद खान यांच्या मुलगा शाहरुख खान यांच्याशी दि ३० एप्रील २०१९ ला धार्मिक विधी प्रमाणे पार पाडला होता. लग्न झाल्यानतंर थोड्याच दिवसात रुखसानच्या घरच्या मंडळीनी तिला मानसिक व शारीरीक त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्याबाबत तीने तीच्या आई जवळ व घरातील मंडळी जवळ सासरच्या जाचाबद्दल बऱ्याचदा सांगितले होते. परंतु काही दिवसांनी ते सुधारतील या आशेने माहेर कडील मंडळीने त्याकडे दुर्लक्ष केले. 6 फेब्रु .21रोजी तिला मुलगा झाला. आता तरी त्रास कमी होईल, अशी आशा होती. 

परंतु तिचा त्रास वाढतच गेला व शेवटी तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेस तिचा पती शाहरूखखान, जवराबी (सासु ) ‘उस्मान खान’ ( सासरे ), मुस्त मीनखान (दीर ) सर्व राहाणार वरणगांव ‘ तसेच नाजमिनबी (नणंद ,रसलपुर ) इ . ना जबाबदार धरून त्यांचेवर योग्य कारवाई व्हावी, असा अर्ज मुलीच्या वडिलांनी वरणगांव पोलीसांत दिला . त्यावरून सासरच्या मंडळीविरुद्ध 306/498/A/34प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

Protected Content