पाच लाखांसाठी विवाहितेचा मारहाण करून छळ !


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील जिजाऊ नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा सासरी मालेगाव येथे पाच रूपयांची मागणी करत शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याची प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी २२ जून रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील जिजाऊ नगर येथील माहेर असलेल्या ललीता कल्पेश गायकवाड वय २७ यांचा विवाह मालेगाव येथील कल्पेश सुधाकर गायकवाड यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला माहेराहून ५ लाख रूपये आणावे अशी मागणी करण्यात आली. दरम्यान विवाहितेन माहेरहून पैसे आणले नाही या रागातून तिला शिवीगाळ व मारहाण करून छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पती कल्पेश सुधाकर गायकवाड, सासरे सुधाकर पुंडलीक गायकवाड, सासू उषा सुधाकर गायकवाड, ननंद निशीनंगध सुधाकर गायकवाड, सर्व रा, मालेगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नितीन चौधरी हे करीत आहे.