पैश्यांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा येथील माहेर आलेल्या विवाहितेचा पैश्यांसाठी छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांवर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

विवाहितेच्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंजूषा बिपीन शेरके (वय-२८) रा. उधना सुरत (गुजरात) ह.मु. सावखेडा ता.जि.जळगाव यांचा २००७ मध्ये बिपीन ब्रिजलाल शेरके यांच्याशी विवाह झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती बिपीन याने घर खर्चासाठी माहेरहून पैसे घेवून ये असा तगादा लावला. पैसे दिले नाही म्हणून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. पैसे आणले नाही म्हणून विवाहितेने नोकरी करावी यासाठी पुन्हा शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर घरातील छोट्या छोट्या कारणावरून विवाहितेला सासु सुशिला ब्रिजलाल शेरके, जेठाणी भाग्यश्री गजेंद्र शेरके, रत्ना संजय शेरके, जेठ संजय ब्रिजलाल शेरके सर्व राहणार उधना सुरत यांनी टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला मुलासह घरातून हाकलुन लावले. विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या मंडळींविरोधात जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनिल तायडे करीत आहे.

Protected Content