जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागातील माहेर आलेल्या विवाहितेला तिच्या चरित्र्याचा संशय घेवून शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात असे की, शहरातील एका भागात २३ वर्षीय महिला यांचा विवाह पारोळा तालुक्यातील हिवरखेडी तांडा येथील तरूणाशी रितीरिवाजानुसार झाला. दरम्यान, लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पतीहा नेहमी पत्नीवर चरित्र्याचा संशय घेत होता. अनेक वेळा विवाहितेस तिच्या नातेवाईकांनी पतीसह सासरकडील मंडळींना समजावून सांगितले. त्यानंतर महिलेच्या पतीने तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेत अश्लिल शिवीगाळ करून छळ करण्यास सुरूवात केली. तसेच मोबाईल फोडून नुकसान केले. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. सोमवारी १३ जून रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे, दीर, नणंद, जेठ आणि जेठाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र पाटील करीत आहे.