दारूच्या पैशांवरून तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आपसात दारूचे पैशांच्या कारणावरून तरूणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केल्याची  घटना घडली. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उमेश सुर्यकांत खुपसे (वय-३५) रा. शिरपूर कन्हाळा रोड, गोविंद कॉलनी भुसावळ हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १० जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उमेश खूपसे हा सुरज कोळी आणि मयूर कोलते रा. मातृभूमी चौक, भुसावळ यांच्यासोबत दारू पिण्यासाठी बसला होता. दरम्यान, आपसात दारूचे पैशांवरून वाटल्याने सुरज कोळी आणि मयूर कोलते यांनी उमेशला बेदम मारहाण केली. यात मयूरने बिअरची बाटली तोंडावर आणि डोक्यावर मारली. यात उमेश खुपसे हा जखमी झाला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमाकांत पाटील करीत आहे.

 

Protected Content