पुण्यातून अपहरण केलेल्या तरुणाची सुटका; दोन जण पोलीसांच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी | उसनवारीने घेतलेल्या तीन लाख रुपयांसाठी पुण्यातील युवकाचे अपहरण करून त्याला दोघांनी त्याला चाळीसगाव मार्गे कारने जळगावात आणले. तरूणाला दोघे जळगावातील रेल्वेस्टेशन परिसरातील हॉटेलवर असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळल्यानंतर शहर पोलीसांनी रेल्वे स्थानकावर धाव घेवून अपहरण केलेल्या तरुणाची सुटका करून अपहरण करणार्‍या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

याबाबत माहिती अशी की, पुणे येथील यज्ञेश विनोदभाई टीलवा ( वय ३०) रा. शिंदे वस्ती, रावेत पुणे हा आरओ वॉटर पुरीफाइडचे काम करतो , याने स्टार नावाची कंपनी तयार करून अनेकांकडून पैसे जमा केले. त्यानुषंगाने सुरक्षा रक्षक दिलीप जगन अवसरमल (वय 30) रा. रक्षक चौक, औध पुणे व सेवा निवृत्त जवान गणेश एकनाथ मोळे (वय- 39) रा.मु पो बॅबिना ता.जि. झाशी (उत्तरप्रदेश) या दोघांनी या कंपनीत पैसे अडकविले होते. दिलीप अवसरमल व गणेश मोळे या दोघांना यज्ञेश याने 3 लाख रुपये उसनवारीने घेतले होते. यज्ञेशकडून या दोघांना तीन लाख रुपये घेणे होते. दोघे यज्ञेशकडे वारंवार पैश्यासाठी तगादा लावत होते. तरी देखील यज्ञेश याने पैसे दिले नव्हते. यज्ञेश हा फोन देखील उचलत नसून पैसे देत नसल्याने सोमवार १३ मे रोजी दुपारी दिलीप अवसरमल व गणेश मोळे या दोघांनी एमएच १२ एनबी ०७४९ क्रमांकाच्या कारमध्ये यज्ञेश याला बळजबरी बसवून त्याचे अपहरण केले होते. याप्रकरणी १३ रोजी पुण्यातील पिंप्री चिंचवड पोलीसात यज्ञेश याची पत्नी स्वाती टिलवा यांच्या फिर्यादीवरून दिलीप अवसरमल व गणेश मोळे या दोघांविरुध्द अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांनी अपहृत यज्ञेश याला पुण्याहून कारने चाळीसगाव येथे आणले. त्यानंतर यज्ञेश व दोघांना समझोता झाला. त्यानंतर यज्ञेश याला घेवून दोघे मंगळवारी सकाळी जळगावात आले. यज्ञेश याला घेवून दोघे रेल्वेस्टेशन परिसरातील हॉटेल अमरप्रेम येथे थांबलेले असतांना त्यांनी पुन्हा चाळीसगाव येथून तीच कार जळगावी बोलविली होती. मंगळवारी सायंकाळी कारचालकासह अन्य एक जण व अपहृत यज्ञेश तिलवा, दिलीप अवसरमल व गणेश मोळे हे पाचही जण जेवण करून जळगाव येथून पुन्हा पुणे येथे जाणार होते.

यज्ञेश तिलवाला या दोघांनी अपहरण करून त्याला जळगावात आणले असल्याची माहिती पिंप्री चिंचवड पोलीसांना मिळाली. त्यानुषंगाने पिंप्री चिंचवड येथील पोलिसांनी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क करून घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहम यांना संशयितांचा शोध घेण्याबाबत सुचना केल्या.

शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, सुनिल पाटील, नवजीत चौधरी, गणेश पाटील, तेजस मराठे यांनी स्टेशन परिसरातून मंगळवारी रात्री दिलीप अवसरमल व गणेश मोळे या दोघांना एमएच १२ एनबी ०७४९ क्रमांकाच्या कारसह ताब्यात घेवून अपहरण केलेल्या यज्ञेशची सुटका केली. रात्री उशिरापर्यंत ताब्यात घेतलेल्या दोघांवर गुन्हा नोंदविण्याचे काम शहर पोलीस करीत होते.

Add Comment

Protected Content