काग्रेंस प्रदेशसरचिटणीसांचा पंतप्रधान पिक योजनेत घोटाळ्याचा आरोप (व्हिडीओ )

WhatsApp Image 2019 05 14 at 9.15.57 PM

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्रात यावर्षी सर्वात मोठा दुष्काळ आहे. दुष्काळात ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे ते शासन करतांना दिसत नसून मुख्यमंत्री फडणवीस आँफीसात बसून सरपंच परीषदा घेण्यात मग्न असून पंतप्रधान पिक योजनेत सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशचिटणीस विनायकराव देशमुख पत्रकार परीषदेत केला.

 

राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळत असतांना त्याला कोणतीही मदत मिळत नाही. चाराअभावी पशुधन कवडीमोल भावाने विकावी लागत आहे. पिण्यासाठी पाणी नाही. अधिकारी शेतकरी योजना पोहचविण्यासाठी अपुर्ण पडत आहे असल्याही आरोपही त्यांनी यावेळी केला.
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाची काग्रेस पक्षाच्या वतीने दुष्काळी दौरा करीत असतांना तेथील अनेक शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला. मंगरूळ गावाला १४ टँकर पाण्याची गरज असतांना फक्त पाच टँकरवर भागवावे लागत आहे. शासनाने लवकरात लवकर जळगांव जिल्ह्यात चारा छावणी उभारावी, टँकरची संख्या वाढवावी अशी मागणी केली. तसेच भाजप सरकारचा पंतप्रधान पिक योजनेत सर्वात मोठा भष्टाचार असल्याचाही आरोप केला. सध्या कोरडवाहू एकरी उत्पन्न दहा किव्टल तर बागायती पाच किक्टल अशा पद्धतीने शासनाने सर्व्हे केला आहे. सध्या शासनाची परिस्थिती “अधळं दळतं कुत्र पिठ खातयं” अशी झाली आहे अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप पाटील म्हणाले की, आम्ही ग्रामीण भागात शेतकरी बांधवाची संपर्क केला असता अनेकांनी समस्यांचा पाढा वाचला.पिक विमामध्ये सर्वात मोठा भष्टाचार झाला आहे. याची आम्ही चौकशीची मागणी करणार आहेत. सरकार एक हाताने देते व दुसऱ्या हाताने घेते.असे सरकारचे धोरण असून दुष्काळी परिस्थिती असतांना शासनाला पाहिजे त्याप्रमाणे गांभीर्य नाही. जळगांव जिल्ह्यात चारा छावणी सुरू करावी, ग्रामीण भागात पाण्याचे टँकर वाढवावे,रोजगार उपलब्ध व्हावा याबाबत जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे मागणी केली.

… आणि देशमुख यांनी व्यक्त केली दिलगिरी
विनायक देशमुख यांनी सांगितले की , १९७२ साली जेवढा भिषण दुष्काळ होता.तशी सध्या परिस्थिती आहे. त्या भिषण दुष्काळात चांगल्या घराण्यातील देशमुख ,पाटलांच्या महीलाही पाणी भरण्यासाठी बाहेर पडत होत्या. तेव्हा जेष्ट पत्रकार राजेंद्र पोतदार यांनी त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घेत विचारले की , इतर समाजाच्या महीला चांगल्या नव्हत्या का? व त्या पाण्यासाठी बाहेर पडल्या नाही का? असा प्रश्न विचारताच त्यांनी दिलगिरी व्यक्त करून माझा तसा बोलण्याचा अर्थ नव्हता असे सांगितले.

पत्रकार परीषदेला महीला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, माजी जिप सदस्य शांताराम पाटील, काग्रंसेचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, गिरीश पाटील, अशोक साळुंखे, मुन्ना शर्मा,सबगव्हानचे सरपंच नरेंद्र पाटील, उपस्थित होते.

Add Comment

Protected Content