चार लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह तिघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी ।  शहरातील गेंदालाल मिल परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेचा कर्ज फेडण्यासाठी माहेरहून चार लाख रूपये आणावे यासाठी नाशिक येथील पतीसह तिघांवर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील गेंदालाल मिल परिसरातील माहेर असलेल्या विवाहिता आरती आकाश निकम (वय-२४) रा. टीएमडब्ल्यू कॉलनी, एकलहरा रोड नाशिक यांचा विवाह ७ मे २०१९ रोजी नाशिक येथील आकाश साहेबराव निकम यांच्याशी झाला. लग्नाचे सुरूवातीचे चार महिने चांगले गेले. त्यानंतर पती आकाश निकम याने कर्ज फेडण्यासाठी माहेरहून चार लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. विवाहिताने माहेरहून पैसे न आणू शकल्याने पती आकाशने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. यासाठी कल्पनाबाई निकम आणि हेमा गजन सर्व रा. नाशिक यांनी पाठबळ दिले. हा प्रकार असहाय्य न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्यात. शहर पोलीस ठाण्यात विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नितीन अत्तरदे  हे करीत आहे.

Protected Content