चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ‘जनता दरबार’

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात जनता दरबार घेण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या.

 

चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरीकांच्या तक्रार निवारण दिन व जनता दरबार शनिवार २ जुलै रोजी सकाळी घेण्यात आला. यावेळी तक्रार निवारण दिना तथा जनता दरबारमध्ये उपस्थित असलेल्या नागरीक व पोलीस पाटील यांच्याकडून सर्व नागरीकांच्या समस्या साजून घेतल्या. तसचे त्यांच्यात होणाऱ्या शेताच्या वादाबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान, शेतीच्या वादातून दोन वेळा भांडण झाल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशान्वेय कलम १४५चा प्रस्ताव पाठविण्यात येईल असे देखील यावेळी सुचित करण्यात आले.

 

याप्रसंगी पोलीस पाटील दूरक्षेत्राचे अंमलदार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सपोनि रमेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, सहाय्यक फौजदार अविनाश पाटील, राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ प्रविण संगेले, पो.ना. शांतीलाल पगारे, दिनेश पाटील, कैलास पाटील, भगवान पाटील, गोवर्धन बोसे, पॉ.कॉ. संदीप पाटील आदी उपस्थित होते.

 

दरम्यान, प्रत्येक महिन्यांच्या पहिल्या शनिवारी हा जनता दरबार घेण्यात येणार आहे. यासाठी नागरीकांना या दिनी येवून आपल्या तक्रारी दाखल करून तातडीने सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबध्द असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.

Protected Content