हुंड्याच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पारख नगरातील माहेर असलेल्या विवाहितेचा हुंड्याच्या पैशांसाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पारख नगरातील माहेर असलेल्या पुजा गोविंद गोपाळ (वय-२०) यांच्या विवाह जामनेर तालुक्यातील मोराळ येथील गोविंद रूपेश गोपाळ यांच्याशी ३१ मे २०२० रोजी रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतर सुरूवातीचे पाच महिने सासरच्या मंडळींनी चांगली वागवणूक दिली. त्यानंतर हुंड्याच्या पैशांची मागणी करून लागले. दरम्यान पैशांची पुर्तता विवाहितेने न केल्याने पतीसह सासरच्या मंडळींनी  पैशांसाठी शारिरीक व मानसिक त्रास देवून छळ करण्यास सुरूवात केली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. गुरूवार ९ जून रोजी दुपारी ४ वाजता विवाहितेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात पती गोविंद रूपेश गोपाळ, उषाबाई रमेश गोपाळ, रविंद्र रमेश गोपाळ आणि गंगूबाई रूषीकेश गोपाळ सर्व रा. मोराळा ता. जामनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल पाटील करीत आहे.

Protected Content