चिमुकलीचा विनयभंग : तरूणाला अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या नऊ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरूणाला अटक करण्यात आली असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात नऊ वर्षीय चिमुकली ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरुवार ९ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुलगी घरी एकटी असताना शाहरुख खान करीम खान (वय-२५) याने नऊ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांनाचा फायदा घेत तिचा हात धरून लैंगिक छळ करून विनयभंग केला. हा प्रकार चिमुकलीच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार ९ जून रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी शाहरुख खान करीम खान (वय-२५) रा. जळगाव याच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!