मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठीबाबत मुजोरी करणाऱ्या सुशील केडिया याचे कार्यालय मनसैनिकांनी फोडताच त्यांनी अखेर या प्रकरणी माफी मागितली आहे.
ख्यातनाम गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी मराठी द्वेषाचे दर्शन घडविल्याने खळबळ उडाली आहे. आपण कधीही मराठी शिकणार नाही असे सोशल मीडियात सांगितल्याने त्यांच्यावर टिका झाली. यातच प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी पुन्हा एकदा उर्मटपणाचे दर्शन घडविल्याने त्यांच्या विरूध्द संतापाची लाट उसळली.
दरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुशील केडिया यांच्या ऑफिसमध्ये तोडफोड करून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर त्यांनी एक्स या सोशल मीडिया मंचावरून एका पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यासह मराठी जनांची माफी मागितली आहे. माझे ट्विट हे मानसिक तणावातून आले होते. याबाबत मी माफी मागतो, लोकांना धमकी नव्हे तर प्रेम जवळ आणते असे देखील केडिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.