मराठा क्रांती मोर्चाचे उद्या आत्म बलीदान आंदोलन

औरंगाबाद । मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत न मिळाल्याने मराठा क्रांती मोर्चाने उद्या आत्म बलीदान आंदोलन करण्याची हाक दिली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनावेळी मराठा समाजातील काही तरुणांनी सरकारचं मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बलिदान दिलं होतं. आंदोलनात जीव गमावलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत दिली नसल्यानं मराठा क्रांती मोर्चातर्फे २३ जुलै रोजी कायगाव टोका येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिली आहे.

मराठी क्रांती मोर्चाच्या काळात काकासाहेब शिंदे या तरुणानं औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका येथे जलसमाधी घेतली होती. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्‍या ४२ जणांच्या कुटुंबातील व्यक्ती या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा मोर्चाच्या वतीनं देण्यात आला आहे. काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतिदिनीच हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Protected Content