यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील मनवेल ग्रामपंचायतच्या दुर्लक्षमुळे वार्ड क्रमांक एक मधील गेल्या वीस वर्षापासून रखडलेल्या विकास कामांना यंदा गती मिळाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.
यात रस्ता व गटारीची आदी समस्या सोडविण्या संदर्भात नागरीकांना दिलेले आश्वासन पुर्ण करण्यात आल्याने येथील रहिवाशी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या कार्यभारावर समाधान व्यक्त होत आहे.
मनवेल ग्राम पंचायतच्या हद्दीतील वार्ड क्रमांक एक मधील प्लाँट पट्टी भागातील नागरीकांच्या मुबलक समस्या यात प्रामुख्याने गटार व रस्त्याची गेल्या वीस वर्षा पासून सुटत नसल्यामुळे रहीवाशी हे त्रस्त झाले होते. मनवेलच्या ग्रामस्थांनी वांरवार समस्यां सोडविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनकडे मागणीव्दारे पाठपुरावा करुन ही विविध कारणे सागून समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या विषयाला घेवुन ग्रामस्थांच्या वतीने असंतोष व्यक्त करण्यात येत होते.
येथील ग्रामपंचायत सरपंच जयसिंग सोनवणे, उपसरपंच मित्राक्षी पाटील व सदस्य यांचा सहकार्याने १५ व्या वित्त आयोगाच्या नीधीतून दलीत वस्ती मधील रस्ता व भुमीगत गटार बांधण्यासाठी दहा लाख रुपयाची कामे तर प्लाँट पट्टी भागात रखडलेल्या गटार बाधूंन आ.लताताई सोनवणे यांचाकडे मागणी करुन पेव्हर ब्लाँक बसवून वार्डच्या चेहरा मोहरा बदल्याने रहीवाशी मध्ये ग्रामपंचायतच्या या विकासत्मक कार्यामुळे ग्रामस्थामध्ये समाधान व्यक्त होत आहे.
वार्ड क्रमांक एक मध्ये रखडलेल्या समस्या पुर्णपणे सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्या सुनंदाबाई पाटील यांनी सागीतले.