खा. सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धांचा सन्मान

बोदवड प्रतिनिधी ।  खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त बोदवड येथे कोरोना काळात सेवा बजाविणाऱ्या आशा व अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांचा “कोरोना योद्धा” म्हणून सन्मान करण्यात आला व वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील ,जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर यांच्या हस्ते कोरोना काळात सेवा देणाऱ्या या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना रोहिणी ताई खडसे म्हणाल्या आज खासदार सुप्रिया ताई सुळे यांचा वाढदिवस असुन सुप्रियाताई  उच्च शिक्षित व अभ्यासु व्यक्तिमत्त्व असून  उत्कृष्ट संसदपटू आहेत संसदेत त्यांनी आतापर्यंत 983 प्रश्न विचारले असुन त्यांच्या कार्याबद्दल त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.

त्यांनी स्त्री भ्रूणहत्येविरोधात आवाज उठवुन केलेल्या कार्यामुळे कित्येक मुलींची गर्भात होणारी हत्या थांबली. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे. ताईंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून सामान्य घरातील युवतींना राजकारणात प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे त्यातून भविष्यातील स्त्री नेतृत्वाचा उदय होत आहे. अशा या सक्षम स्त्री नेतृत्वाच्या जन्मदिनी आपल्या सारख्या कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात येत आहे 

यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष वंदना चौधरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नगराध्यक्ष मुमताज बि बागवान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ उद्धव पाटील ,उपनगराध्यक्ष दिनेश माळी, जिल्हा दुध संघ संचालक मधु  राणे, बाजार समिती उपसभापती सुभाष पाटील,बाजार समिती संचालक रामदास पाटील, नगरसेवक कैलास चौधरी, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ काजळे,डॉ आतिष चौधरी, सईद बागवान,किसान आघाडी तालुकाध्यक्ष वामनराव ताठे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष वंदना पाटील, जेष्ठ नेते कडु  माळी,अनिल  पाटील, शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर, जिल्हा चिटणीस रवींद्र खेवलकर, विजय चौधरी,गोपाळ भाऊ गंगतिरे, विनोद कोळी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content