मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास दिला नकार

अंतरवाली सराटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणात सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील यांचे गेल्या 3 दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यातच आज मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे.

जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. आमरण उपोषण सुरू आहे तरी सरकार जाणूनबुजून बैठका घेत आहे. सरकारला काळजी असती तर त्यांनी दखल घेतली असती. मात्र त्यांनी दखल घेतली नाही. त्यांना मराठे चांगला हिसका दाखवतील,’ असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. यादरम्यान, त्यांनी छगळ भुजबळ यांच्यावरही टिका केली.

Protected Content