मनोज जरांगेना झेड प्लस सुरक्षा दया; मराठा समाजाची मागणी

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी आता करण्यात आली आहे. या साठी मराठा समाज आक्रमक झाला असून छत्रपती संभाजीनगर मधील केंब्रिज चौक येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता राको आंदोलन करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसदर्भातील मुद्दा आता तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन स्थळ असलेल्या अंतवाली सराटी गावावर ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. या वृत्ताचे पडसाद विधान सभेत देखील उमटले होते. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी गंभीर दाखल घेण्याची मागणी केली होती. तसेच शासनाने मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी देखील केली होती. या वर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र आता या संदर्भात मराठा समाज आक्रमक झाला असून मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

Protected Content