‘लेडीज स्पेशल’ मतदान केंद्र बनले आकर्षणाचा केंद्रबिंदू ! ( व्हिडीओ )

भुसावळ संतोष शेलोडे । आज सकाळपासून शहरात मतदानास प्रारंभ झाला असून यात खास महिलांसाठी असणारे मतदान केंद्र आकर्षणाचे केंद्रबिंदू बनल्याचे दिसून येत आहे.

आज सकाळी सात वाजेपासून लोकसभेसाठी मतदानास प्रारंभ झाला आहे. यासाठी अगदी नव मतदारांपासून ते वृध्दांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. मात्र काही ठिकाणी यादीत नावे शोधतांना नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, भुसावळ शहरातील महिला महाविद्यालयांमध्ये विशेषतः महिला मतदारांना आकर्षित करण्याकरिता गुलाबी पडद्याची सजावट करून सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले आहे. मतदान केंद्र क्रमांक १५ वर सखी मतदान केंद्राची संकल्पना राबविली आहे .या मतदान केंद्रावरील सर्व कामकाज महिला सांभाळत आहेत. मतदान केंद्राध्यक्ष महिलाच असून बंदोबस्ताची जबाबदारी देखील कर्मचार्‍यांकडे आहे. या मतदान केंद्रावर ७८६ मतदार असून यात ३७१ महिलांचा समावेश आहे . मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाचा हक्क बजवावा यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. झोनल अधिकारी म्हणून मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर कामकाज पाहत आहे . या मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या सजावटीकडे मतदारांचे लक्ष वेधले गेले आहे. एकंतरीतच या संकल्पनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पहा : ‘लेडीज स्पेशल’ मतदान केंद्राचा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content