‘त्या’ सरपंचासह चौघांना पोलीस कोठडी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जुगार अड्डयावर धाड टाकणार्‍या पोलिसांना धक्काबुक्की करणार्‍या कुर्‍हे पानाचे येथील सरपंचासह चौघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

भुसावळ तालुका पोलिसांनी कुर्‍हे पानाचे येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून १६ जुगारी पकडले होते. यावेळी सरपंच जीवन प्रल्हाद पाटील, प्रमोद रामा भोई, ईश्वर भागवत भोई व सुभाष भिका पाटील यांनी पोलिसांना मारहाण करून दोन संशयितांना पळवून लावले होते. सरपंच जीवन पाटील यांनी पोलिसांना धक्काबुक्की देखील केली होती. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती.

दरम्यान, याप्रकरणी चौघांना अटक झाली होती. या संशयितांना बुधवारी भुसावळ न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: