मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची २९ ऑगस्टची बैठक पुढे ढकलली

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आंदोलनाच्या माध्यमातून राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र, या संदर्भातला अंतिम निर्णय आपण 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या बैठकीत घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुका डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणुका लांबल्यामुळे आपल्याला २९ ऑगस्टची बैठक देखील लांबवली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. निवडणूक लांब आहे, त्यामुळे आमचे डावपेच सरकारला कळू द्यायचे नाही. त्यामुळे निवडणुकीची तारीख जाहीर होईल, त्यावेळेस बैठक घेणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुक उमेदवारांना तयारीला लागा, कागदपत्रे तयार ठेवा, अशा सूचना केल्या होत्या. तोपर्यंत सर्व इच्छुकांच्या अर्जाची छाननी करून ठेवणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांनी 24 ऑगस्ट पर्यंत आपले अर्ज घेऊन यावेत, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

Protected Content