आंतरवाली सराटी-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा |मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीत मनोज जरांगेनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. फडणवीसांचा मला संपवण्याचा डाव आहे, त्याच्यामुळेच मराठयांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही आहे असे मनोज जरांगे यावेळ म्हणाले.
यावेळी ते आक्रमक झाले आणि त्यांनी मी सागर बंगल्यावर येतो तेथे मला संपवून दाखवा असा इशाराही यावेळी दिला. यादरम्यान ते स्टेजवरून सागर बंगल्यावर जाण्यासाठी निघाले. आंदोलनस्थळी उपस्थित मराठा समाज बांधवानी त्यांना न जाण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे यांची प्रकृती खराब नसल्याने ते चालत न जाता गाडीमध्ये बसले आहेत. मराठा समाजाचा मोठा जमाव त्यांच्यासोबत निघाला आहे. ते फडणवीसांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर सरकार काय करते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे
मनोज जरांगे पाटील सागर बंगल्यावर दिशेने रवाना
10 months ago
No Comments