Home Cities अमळनेर चाकू व फायटरने दोन भावांना बेदम मारहाण

चाकू व फायटरने दोन भावांना बेदम मारहाण

0
62

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घराशेजारील असलेल्या जागेच्या मालकी हक्काच्या बाबत न्यायालयात सुरू असलेल्या जुन्या वादातून दोन भावांना चाकू व फायटरने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार अमळनेर तालुक्यातील चांदणी कुऱ्हे गावात घडला आहे. याप्रकरणी शनिवारी अमळनेर पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रेमसिंह नाना पाटील (वय-२७, रा. चांदणी कुऱ्हे ता. अमळनेर) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांच्या घराशेजारी राहणारे प्रदीप रामसिंग पाटील आणि त्यांच्यात घराजवळील जागेच्या मालकीच्या हक्काबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. शुक्रवार २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जुन्या वाद निर्माण झाला. यात प्रेमसिंग नाना पाटील आणि त्याचा भाऊ निलेश नाना पाटील यांना गावातील प्रदीप रामसिंग पाटील, भामाबाई उर्फ भारती प्रदीप पाटील, प्रवीण मूलचंद पाटील, भिका करमसिंग पाटील आणि प्रवीण प्रताप पाटील या ५ जणांनी शिवीगाळ करत चाकूने आणि फायटरने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच दोन्ही भावांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर प्रेमसिंग पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० वाजता संशयित आरोपी प्रदीप रामसिंग पाटील, भारती प्रदीप पाटील, प्रवीण मूलचंद पाटील, भिका करमसिंग पाटील आणि प्रवीण प्रताप पाटील या पाच जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ. रामकृष्ण कुमावत हे करीत आहे.


Protected Content

Play sound