वासुमित्रा फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव येथील मेहरुण भागातील वासुमित्रा फाउंडेशनतर्फे संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मेहरुण परिसरात स्वच्छता अभियान राबवून त्यांना कृतिशील वंदन करण्यात आले.

सुरुवातीला वासुमित्रा फाउंडेशनतर्फे संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष भूषण सोनवणे यांनी माल्यार्पण केले. यानंतर वासुदेव सोनवणे यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्रविषयी माहिती दिली. यानंतर मेहरुण भागातील रामेश्वर कॉलनी, स्वामी समर्थ चौक आदी भागांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी सुरेश ठाकरे, सदाशिव सोनवणे,जयेश पाटिल, जयेश सोनवणे, संदीप सोनवणे, कैलास सोनवणे, दिपक बाविस्कर, संदीप येवले, राहुल देशमुख, विनोद ढमाले, प्रशांत सोनवणे, प्रमोद सोनवणे, विजय सोनवणे, धनंजय सोनवणे, विलास भदाने ,रवींद्र सोनवणे, रमण ठाकरे, शंभू सोनवणे ,भैय्या ठाकरे,बापू माळी, शशी पाटील, धीरज केणे, केतन सोनवणे आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Protected Content