Home राज्य बच्चू कडू यांचा अपघात : दुचाकीने दिली धडक

बच्चू कडू यांचा अपघात : दुचाकीने दिली धडक

0
102

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा माजी मंत्री आ. बच्चू कडू यांना दुचाकीने धडक दिल्याने ते जखमी झाले आहेत.

आमदार बच्चू कडू हे रस्ता ओलांडत असतांना त्यांना एका भरधाव दुचाकीने धडक दिली. यात ते जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला आणि पायाला जखमा झाला. यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला चार टाके घालण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हा अपघात सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. दुचाकीने धडक दिल्यानंतर बच्चू कडू हे रोडाच्या दुभाजकावर आदळल्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तर त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नसल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.


Protected Content

Play sound